नाशिक -शहर पोलिसांनी संचारबंदीच्या काळात आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. संचारबंदीमध्ये रस्त्यावर मजा लुटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर थेट वाहन जप्तीची कारवाई केली जात आहे. सध्या शहरात ६२५ नागरिक प्रशासनाच्या निगराणी खाली असून, १९ ते ३१ मार्चदरम्यान ६८१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
सावधान..! दुचाकीवर फिराल तर गाडी जप्त होणार,आयुक्त नांगरे पाटलांचा निर्णय
स्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांची करडी नजर असून, अशी १७२ वाहने लॉकडाऊन संपेपर्यंत पोलिसांनी जमा केली आहेत. त्यामुळे 'घरात रहा सुरक्षित रहा' अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा आयुक्त नांगरे पाटील यांनी दिला आहे.
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांची करडी नजर असून, अशी १७२ वाहने लॉकडाऊन संपेपर्यंत पोलिसांनी जमा केली आहेत. त्यामुळे 'घरात रहा सुरक्षित रहा' अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा आयुक्त नांगरे पाटील यांनी दिला आहे. कर्फ्यू नियमांमधून सवलत मिळवून मजा लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही तरुणांना नाशिक पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला. रक्तपेढीच्या नावाखाली मोकळ्या रस्त्यावर पर्यटन करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी कायद्याचा प्रसाद दिला. नाशिक शहरातील पोलिसांनी हे कडक धोरण आखले असून, विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर दिसल्यास नाशिककरांना वाहनाला मुकावे लागणार आहे.