नाशिक - मतदार नेहमी म्हणतात सर्व लोकप्रतिनिधी सारखेच, मी मतदान केले नाही तर काही बिघडणार नाही, असा विचार मतदारांच्या मनात येतो, अनेक निवडणुकांमध्ये एका मताने उमेदवाराला विजय मिळतो किंवा उमेदवार पराभूत होतो, त्यामुळे मतदानाचा हक्क बजावून मतदान करा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले.
सहलीला जाऊ नका; मतदान करा, जिल्हाधिकारी सुरज मांढरेंचे आवाहन - loksabha
मतदानाच्या दरम्यान जोडून आलेल्या सुट्ट्या न घेता मतदान करावे, असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.
मतदानाच्या दरम्यान जोडून आलेल्या सुट्ट्या न घेता मतदान करावे, असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. प्रशासनाची गेल्या महिनाभरापासून मतदानासाठी तयारी जवळपास पूर्ण झाली आहे, येत्या २९ तारखेला मतदान करून आपल्या मतदारसंघात उभे असलेल्या योग्य उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन सुरज मांढरे यांनी केले.
तसेच गरोदर मतदार, वयस्कर महिला, दिव्यांग मतदार, यांच्यासाठी विशेष व्यवस्था मतदार केंद्रावर करण्यात आली आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत मतदान प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचीही माहिती जिल्हा अधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.