महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपचे तीन आमदार विधानसभेच्या तयारीला, नगरसेवकांना खूश करण्याचा प्रयत्न

विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे आमदारांनी आपला जनसंपर्क वाढविण्याबरोबरच आपल्या मतदारसंघातील नगरसेवकांना महापालिकेतील वेगवेगळ्या समित्यांवर कशी नियुक्ती करता येईल, यासाठी लॉबिंग केले.

नाशिक

By

Published : Jul 10, 2019, 10:04 AM IST

Updated : Jul 10, 2019, 3:26 PM IST

नाशिक - भाजपचे तिन आमदार आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदारांच्या मनोमिलनातून नगरसेवकांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या विशेष महासभेत मंगळवारी एकून ३६ नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली. सत्ताधारी भाजप असल्याने एकूण भाजपच्या २० नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय स्थायी समितीवरदेखील एक सदस्य निवडण्यात आला असून त्यासाठी आमदारांनी चांगलेच लॉबिंग केले आहे.

विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आमदारांनी आपला जनसंपर्क वाढविण्याबरोबरच आपल्या मतदारसंघांतील नगरसेवकांना महापालिकेतील वेगवेगळ्या समित्यावर कशी नियुक्ती करता येईल, यासाठी लॉबिंग केली होती. शहरातील आमदारांनी जास्तीत जास्त नगरसेवकांना विषय समित्यांवर कसे पाठविता येईल, यासाठी पालकमंत्र्यांपर्यंत बैठका लावत फिल्डिंग लावली होती. त्याचबाबत गेल्या काही दिवसांपासून नाशिक मनपातील विषय समित्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यासाठी नाशिक महानगरपालिकेने विशेष महासभा बोलावली. त्यात महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषय समित्यांवर नगरसेवकांच्या नियुक्त्या जाहीर करत त्यांचे अभिनंदनही केले.

नाशिक

या नियुक्तीदरम्यान, नाशिक पूर्वचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आघाडी घेतली. सानप यांच्या मतदारसंघांतील एकूण ८ नगरसेवकांची निवड करण्यात आली असून शिवाय स्थायी समितीमध्ये एक महत्त्वाचा सदस्य देखील आपल्याच मतदारसंघातील निवडण्यात त्यांनी बाजी मारली. या निवडीमध्ये मात्र नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे आणि पश्चिम नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांना प्रत्येकी ६ नगरसेवकांची नियुक्ती करण्यात यश आले. दोघीही या विषय समित्यांमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिल्या आहेत.

नाशिक महानगरपालिकेतील कोणकोणत्या नगरसेवकांची कोणत्या समितीवर पक्षनिहाय निवड -

- महिला बालकल्याण समिती सदस्य : भाजप - पूनम सोनावणे, मीरा हांडगे, प्रियंका घाटे, हेमलता कांडेकर, इंदुमती नागरे. शिवसेना - रंजना बोराडे, सीमा निगळ, हर्षदा बडगुजर. राष्ट्रवादी काँग्रेस - समीना मेमन.

- शहर सुधारणा समिती सदस्य : भाजप - शांताबाई हिरे, डॉ. सीमा ताजणे, सुरेश खेताडे, छाया देवांग, अनिल ताजनपुरे. शिवसेना - भागवत आरोटे, सुदाम डेमसे, डी जी सूर्यवंशी. काँग्रेस - राहुल दिवे.

- विधी समिती सदस्य : भाजप - अनिता सातभाई, रुची कुंभारकर, निलेश ठाकरे, रवींद्र धिवरे, राकेश दोंदे. शिवसेना - सूर्यकांत लवटे, चंद्रकांत खाडे, डी जी सूर्यवंशी. राष्ट्रवादी काँग्रेस - शोभा सावळे.

- वैद्यकीय, आरोग्य समिती सदस्य - भाजप - पूनम धनगर, अंबादास पगारे, दीपाली कुलकर्णी, शाम बडोदे, अर्चना थोरात. शिवसेना - रमेश धोंगडे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले. काँग्रेस - आशा तडवी. या नगरसेवकांची निवड झाली आहेत.

आमदारांनी केलेल्या मनोमिलनाचे फळे त्यांना मिळेल की, नाही हे येत्या काळात स्पष्ट होईलच. मात्र, सध्या नाशिकमधील नगरसेवकांसह राजकीय वर्तुळात आमदारांनी केलेल्या लॉबिंगची जोरदार चर्चा रंगली आहे.

Last Updated : Jul 10, 2019, 3:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details