नाशिक - भाजप आमदार देवयानी फरांदे (नाशिक मध्य) यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट आले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे दुपारीच त्यांनी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत सहभाग घेतला होता. यावेळी त्या भाषण करत असताना काही मराठा बांधवानी त्यांच्या भाषणावर आक्षेप घेत त्यांच्या भोवती घेराव घालून गोंधळ घातला होता. त्याच्या काही वेळानेच फरांदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांनी संपर्कात आलेल्या सगळ्यांनाच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे. मी चार ते पाच वेळा कोरोना चाचणी केली होती. मात्र, निगेटिव्ह आली, आज मुंबई अधिवेशन आणि जळगाव येथे प्रवास केल्यामुळे खबरदारी म्हणून पुन्हा चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, ही विनंती अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली आहे.