नाशिक- मुंबई नाका येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे कारच्या काचा फोडून दुचाकीस्वारांनी सुमारे 15 लाखांची लूट केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा काही तासांतच भांडाफोड करण्यात मुंबईनाका पोलिसांना यश आले आहे.
तक्रारदारानेच रचला होता कट -
संशयित आरोपी राजेंद्र भालेराव व त्याचा मित्र रामा शिंदे याने या चोरीचा बनावट प्लॅन करत चोरी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी भालेराव याच्यासह त्याचा मित्र रामा शिंदे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भालेराव यांचे दोन मित्र फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. मयूर राजेंद्र भालेराव रा. पंचवटी यांनी या प्रकरणी पोलीसात तक्रार दिली होती.
आरोपीसह मित्राला अटक -
लुटीच्या या घटनेत तक्रारदारच आरोपी निघाला असून त्याने साथीदारांसह लुटीचा प्लॅन आखून ही रक्कम पळविण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी तक्रारदारासह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. ही रक्कम रोलेट जुगाराशी संबंधित असल्याची चर्चा असल्याने या प्रकरणी वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.
काय होते प्रकरण -
मयूर राजेंद्र भालेराव रा. पंचवटी याच्या मालकाने एका व्यक्तीला देण्यासाठी लाखोंची रोकड त्याच्या ताब्यात दिली होती. शुक्रवारी दुपारच्या सुमारास द्वारका मार्ग ते मुंबई नाका परिसरात कारमध्ये चालकाच्या आसनावर बसले असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने कोयत्याने कारची पाठीमागील खिडकीची काच फोडून रोकड असलेली पिशवी काढून घेतली होती. याप्रकरणाची तक्रार मयूरने मुंबईनाका परिसरात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : कोल्हापुरातल्या 'ओपन फ्रीज'मुळे मिटतेय अनेकांची भूक