महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Bribe : शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कारकून लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात - Nashik Bribe News

Nashik Bribe : नाशिकात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून मागील काही महिन्यांपासून धडाकेबाज कारवाई सुरू आहे. मात्र असे असले तरीही लाचखोरांची खाबुगिरी वाढतच असल्याचं दिसून येतंय. खासगी शाळेतील शिपायाला वेतन सुरू करुन देण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला 50 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केलीय.

शिक्षक उपसंचालक कार्यालयातील क्लर्क लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात
Nashik Bribe

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 7:20 PM IST

शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस अधीक्षक

नाशिक Nashik Bribe : खासगी शाळेतील शिपायाला वेतन सुरू करुन देण्यासाठी नाशिकमधील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला 50 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केलीय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होत असलेल्या या धडक कारवाईचं सर्वत्र कौतुक होतंय. (Nashik Bribe News)

वेतन सुरू करण्यासाठी मागितली लाच : नाशिकमधील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून मागील काही महिन्यांपासून धडाकेबाज कारवाई सुरू आहे. तरीही लाचखोरांची खाबुगिरी कमी होताना दिसत नाही. मागील आठवड्यात दोन मोठ्या कारवाया केल्यानंतर आता पुन्हा शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केलीय. एका खासगी शाळेतील शिपायाला कुठलेही वेतन मिळत नव्हते, ते वेतन सुरू करुन देण्यासाठी नाशिकच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक दिगंबर अर्जुन साळवे (वय 55 रा. टाकळी) याने 50 हजाराची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदारानं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करत एसीबीच्या पथकानं शिक्षण उपसंचालक कार्यालयात दिगंबर साळवे याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केलीय.



जीएसटी अधिकारी अटकेत : लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं 15 दिवसांपूर्वीच एका जीएसटी अधिकाऱ्याला 40 हजारांची लाच घेताना अटक केली होती. तक्रारदाराचा जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय असून जीएसटी भरणे बाकी होते. अशात राज्य कर अधिकारी जगदीश पाटील याने तक्रारदाराकडे जाहिरात चित्रकरणाच्या कामात व्यत्यय येऊ नये यासाठी चित्रीकरणाची वाहने जीएसटी दंड न भरता सोडून देतो असे सांगत 40 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर तक्रारदाराकडून 40 हजारांची लाच स्वीकारताना पाटील यास एसीबीच्या पथकाने अटक केली. पाथर्डी फाटा येथील वस्तू व सेवा कर कार्यालयात पाटील याला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली होती.


एपीआयसह शिपायास अटक : आठ दिवसापूर्वी नाशिक एसीबीनं सापळा रचून अभोना पोलीस ठाण्याच्या एपीआयसह पोलीस शिपायालाही 10 हजारांची लाच घेताना अटक केली होती. लाचखोरांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस ठाण्यातच दहा हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अभोना पोलीस ठाण्यातील शिपाई कुमार गोविंद जाधव याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा :

  1. Social Media Account Hacking : पोलीस, शासकीय अधिकाऱ्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; अनेकांकडे पैशाची मागणी
  2. Nashik Crime : भरबाजारपेठेत भाजी विक्रेत्याचा सपासप वार करून खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
  3. Nashik Crime News : पत्नीचा खून करत पतीची आत्महत्या, नेमकं कारण काय?

ABOUT THE AUTHOR

...view details