जागतिक जंपरोपमध्ये नाशिकचे खेळाडू विजयी नाशिक : भारतातर्फे नाशिकच्या चार आणि डोंबिवलीच्या नऊ खेळाडूंनी अमेरिकेच्या कोलोरॅडो येथे झालेल्या जागतिक जंपरोप स्पर्धेत सहभाग घेतला होता. नाशिकचे नमन गंगवाल, राजुल लुंकड, नियती छोरीया, भारवी हिरण तसेच प्रशिक्षक तन्मय कर्णिक यांच्यासोबत, छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे संघ प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते. खेळाडूंनी वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये भाग घेऊन पदकांची लयलूट केली.
25 देशातील बाराशे खेळाडू सहभागी: दुहेरीमध्ये नमन गंगवाल, नियती छोरीया यांना सिल्व्हर पदक मिळाले. 30 सेकंद गति रिलेमध्ये एशान पुथरण, भूमिका नेमाडे, नमन गंगवाल, नियती छोरीया यांनी सुवर्णपदक पटकवले. डबल टच स्पीड प्रिंटमध्ये गंगवाल, नियती छोरीया, राजुल लुंकड यांनी सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत प्रथमच भारतीयांना जागतिक चॅम्पियनशिपमध्ये इतकी पदके मिळाली असल्याचा दावा करण्यात आला. या स्पर्धेत 25 देशातील बाराशे खेळाडू सहभागी झाले होते.
आता लक्ष 2024-25 : अमेरिकेच्या कोलोरॅडोमध्ये झालेल्या जागतिक जपंरोप स्पर्धेत 25 देशातील खेळाडू सहभागी झाले होते. यात चांगली कामगिरी केली याचा आम्हाला आनंद आहे, आज नाशिककरांनी आमचे ज्या पद्धतीने स्वागत केले, हे बघून आम्ही भरवून गेलो, असे विजेत्या स्पर्धकांनी सांगितले. तर पुढच्यावर्षी 2024 जपान मध्ये एशियन गेम आहेत. तसेच 2025 मध्ये परत जपानमध्ये जागतिक जपंरोप स्पर्धा आहे. जपानमध्ये सहभाग घेऊन भारताला अधिक मेडल मिळून देण्याचा आमचा मानस असल्याचे मत विजेत्या स्पर्धकांनी व्यक्त केले.
जपंरोपचा शालेय खेळात समावेश व्हावा : शासनाकडे आमची मागणी आहे की, जपंरोप खेळाचा शालेय खेळामध्ये सहभाग व्हावा. जेणेकरून मुलांना खेळासाठी आर्थिक मदत मिळेल आणि महाराष्ट्रातून अधिकाधिक खेळाडू जागतिक स्पर्धेत आपली चमक दाखवू शकतील, अशी प्रतिक्रिया जपंरोपचे प्रशिक्षक तन्मय कर्णिक यांनी दिली आहे.
हेही वाचा -
- Agniveer Prajwal Tawari : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; प्रज्वल बनला पेणचा पहिला अग्निवीर
- Wimbledon 2023 Mens Singles Final : विम्बल्डन ग्रँडस्लॅममध्ये कार्लोस अल्कराझने रचला इतिहास, जोकोव्हिचला चारली पराभवाची धूळ
- Tata Mumbai Marathon : भारतीय महिलांच्या पूर्ण मॅरेथॉन गटात चावी यादव विजयी; विजयनानंतर म्हणाली, "25 किलोमीटरपर्यंत... "