नाशिक -नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवी मंदिराला तीनशे वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रविवारपासून सुरू होणाऱ्या उत्सवासाठी मंदिर प्रशासनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे.
यावर्षी धार्मिक कार्यक्रमासोबतच भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर प्रशासनाच्यावतीने विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता मंदिरात परिसरात येण्या-जाण्याच्या मार्गावर वॉटरप्रुफ मंडप टाकण्यात आला. तसेच महिला, पुरुषांसह दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने मंदिर परिसरात 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, 60 सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले आहेत.