नाशिक- देशात ३१ मेपर्यंत चौथे लॉकडाऊन सुरू राहणार आहे. मात्र लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथीलता देण्यात आली आहे. केंद्र ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नागरिकांना लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रवासी विमान वाहतुकीलादेखील परवानगी देण्यात आली आहे.
नाशिक-अहमदाबाद विमान सेवा सोमवारपासून सुरू होणार - प्रवासी विमान वाहतूक सुरू
गेल्या २३ मार्चपासून बंद असलेल्या शिर्डी आणि नाशिक एअरपोर्ट वर २५ मे पासून विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या २३ मार्चपासून बंद असलेल्या शिर्डी आणि नाशिक एअरपोर्ट वर २५ मे पासून विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात शिर्डी-हैदराबाद आणि नाशिक-अहमदाबाद अशी विमानसेवा सोमवारपासून सुरू होत आहे. सध्या सिव्हिल एव्हिएशन आणि इंडिगो यांना दोन फ्लाईट्सना परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्यांनी आठवडाभराचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात प्रवास करताना घेण्याची खबरदारी तसेच जिल्हा प्रशासनालाही प्रशासकीय जबाबदाऱ्यांचे निर्देश देण्यात आले आहेत.