महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचे लिलाव होणार सुरू' - Nashik corona

नाशिकमध्ये लागू केलेले कडक निर्बंध (दि. २३) पासून शिथिल करण्यात येणार आहेत. यामध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचे लिलाव सुरू होणार आहेत. मात्र, यासाठी सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

'नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचे लिलाव होणार सुरू'
'नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचे लिलाव होणार सुरू'

By

Published : May 23, 2021, 4:31 PM IST

Updated : May 23, 2021, 5:13 PM IST

नाशिक - कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने नाशिकमध्ये लागू केलेले कडक निर्बंध (दि. २३) पासून शिथिल करण्यात येणार आहेत. यामध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचे लिलाव सुरू होणार आहेत. मात्र, यासाठी सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे, अशी माहिती सभापती देवीदास पिंगळे यांनी दिली आहे.

'नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचे लिलाव होणार सुरू'

'नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे'

नाशिक जिल्ह्यात एकूण १६ बाजार समित्या असून, प्रत्येक ठिकाणी विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी येत असतो. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्या, सर्व प्रकारच्या फळभाज्या, कांदा, लसूण, बटाटा तसेच डाळिंब, आंबा ही फळे मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असतात. जिल्ह्यासह राज्याच्या बाहेरही शेतमाल पाठवला जातो. यातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये (दि. १२ ते २३ मे) पर्यंत कडक लॉकडाउन केले होते. यात बाजार समित्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. अगोदरच या आसमानी संकटांनी शेतकऱ्यास घेरले आहे. त्यामध्ये बाजार समिती बंदमुळे शेतमाल हा नाशवंत असल्याने त्याची विल्हेवाट लावायची कशी, असे दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर उभे होते. या संकटातून मार्ग काढण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्या समवेत चर्चा करुन, लॉकडाउनमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीबाबत चर्चा केली. काही अडचणी वाढल्या तर त्याची आपण स्वतः जबाबदारी स्वीकारू असे आश्वासन पिंगळे यांनी दिले. शासकीय नियमांचे पालन करीत बाजार समिती सुरू करावी, असी विनंती त्यांनी केली. मात्र, बाजार समिती बंदच ठेवण्यात आली होती. परंतु, आता रविवार (दि.२३) रोजी लॉकडाउनची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर दिंडोरी रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट, नाशिकरोड उपबाजार आवार शेतमाल लिलावासाठी सुरू करणार असल्याचे सभापती पिंगळे यांनी सांगितले.

'२५ टक्के हमालांच्या उपस्थितीत काम सुरू राहणार'

आडत्यांनी २५ टक्के हमालांच्या उपस्थितीत काम करावे, महिला हमाल वर्गास प्रवेश बंद, सामाजिक अंतर ठेवणे, लिलावाचे ठिकाणी मालामध्ये १० फुटांचे अंतर, एक वाहन एक व्यक्तीस प्रवेश, बाजार समितीने सुचविलेल्या जागेमध्येच शेतकऱ्यांनी वाहन पार्क करणे बंधनकारक, शेतीमाल ठरवून दिलेल्या वेळेच्या एक तास अगोदर आवारात विक्रीसाठी आणावा, अनाधिकृत व्यक्तीवर कायदेशिर कारवाई होणार, व्यापाऱ्यांनी शेतीमाल खरेदी केल्यानंतर २ तासात तो माल पॅकींग करून बाजार समितीच्या आवारात घेऊन जाणे बंधनकारक, व्यापारी व हमाल यांना ओळखपत्र बघून प्रवेश दिला जाईल असे नियम यामध्ये ठरवण्यात आले आहेत.

'किराणा दुकाने बंदच'

समितीच्या आवारात किरकोळ किराणा माल व अन्नधान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. किरकोळ भाजीपाला व वजनकाट्यावर विक्री करणारे, चवळी-दलाल यांचेही व्यवहार पूर्णपणे बंद, रात्रीच्या वेळेचे शेतीमालाचे व्यवहार चालू राहतील. मात्र, किरकोळ विक्री बंद राहील, कांदा-बटाटा, फळे या शेतीमालाचे व्यवहार सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत सुरू राहतील.

'कोरोना चाचणी बंधनकारक'

शेतीमालाच्या लिलावाच्या वेळी कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याची संबंधित आडतदार, व्यापाऱ्याने दक्षता घ्यावी. तसेच, आवश्यकता असल्यास काही घटकांची कोवीड चाचणी सक्तीने करणे आडतदार, व्यापाऱ्यास बंधनकारक राहील. शेतमाल घेवून येणाऱ्या व्यक्तीला कोवीड चाचणी रिपोर्ट सक्तीचा राहील.

'कुठे काय उपलब्ध असेल'

१) पंचवटी मार्केटयार्ड (दिंडोरीरोड) वांगे, काकडी,ढो. मिरची, भोपळा, कारले, दोडके, गिलके इ. सर्वप्रकारच्या फळभाज्या लिलावाची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहणार. तर, गाजर वटाणा, आले, मिरची, घेवडा, भु. शेंगा इ. दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत. पालेभाज्या सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत.

२) शरदचंद्रजी पवार मार्केटयार्ड

(पेठरोड) लिलावाची वेळ कोबी, फ्लॉवर,सकाळी ११ ते दुपारी २ टोमॅटो : दुपारी ४ ते ६

३) नाशिकरोड उपबाजार आवार पालेभाज्या दुपारी ५ ते ८ वाजेपर्यंत

Last Updated : May 23, 2021, 5:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details