महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषीमंत्री मजामस्ती करतायेत, शेतकऱ्यांकडे लक्ष कोण देणार?; सत्तारांच्या दारु गप्पांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया - Nashik administration in their work

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौरा केला. सिन्नर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. तसेच, अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही उपस्थित होते.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

By

Published : Oct 27, 2022, 4:53 PM IST

Updated : Oct 27, 2022, 9:21 PM IST

नाशिक - अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौरा केला. सिन्नर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. तसेच, अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांचा शेतकऱ्यांशी संवाद

कृषी मंत्री मजा मस्ती मध्ये - आज शेतकरी अडचणीत असताना राज्याचे कृषिमंत्री मात्र मजा मस्ती मध्ये आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बांधावर जाणे गरजेचे आहे. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या पाहिजे. त्यांना तात्काळ मदत कशी मिळेल याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, ते होताना दिसत नाही असही आदित्य म्हणाले आहेत.

म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहे -परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, अशात सरकार आणि प्रशासनाने त्यांना वाऱ्यावर सोडल असून त्यांना मदत कुठल्याही प्रकारची मिळात नाही, त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या अशी टीकाही त्यांनी केली आहे.

प्रत्येक वेळी आंदोलन केले पाहिजे असं नाही -संवेदनशील सरकार असतं तर आंदोलन करण्याची गरज काय, पण प्रत्येक वेळी आंदोलन का करावे, आंदोलन केले तर तेच लाठीचार्ज, गुन्हे, राजकीय तडीपाऱ्या यांना आम्ही घाबरत नाही, पण आंदोलन पेक्षा अडचणी असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी कोणी मंत्र्यांनी बांधावर आलं पाहिजे असं माझी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहेत.

शिधा वाटप मध्ये मोठा घोटाळा पुढे येऊ शकतो -राज्य सरकारकडून वाटण्यात येणारा शिधा अद्याप लोकांपर्यंत पोहोचला नाही,तसेच शिधा वाटप करताना किती वस्तू होत्या ? किती वस्तू कमी पोहोचल्या ? टेंडर किती रुपयाला दिलं ? किती दिवसासाठी होतं ? याची माहिती घेणे गरजेचे आहे,कदाचित शिधा वाटप मध्ये मोठा घोटाळा पुढे येऊ शकतो असे भाकीत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

Last Updated : Oct 27, 2022, 9:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details