नाशिक -शहर रेड झोनमध्ये असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, 22 मे ते 31 मेपर्यंत नाशिक शहर संपूर्णपणे बंद राहणार असल्याची अफवा पसरवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तलाठी आनंद मेश्राम यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामध्ये काही समाजकंटकांनी फेरफार करत, नाशिक शहर 22 मे ते 31 मेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवली. यामुळे नाशिकच्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तेव्हा मांढरे यांच्या आदेशावरून तलाठी आनंद मेश्राम यांनी सरकार वाडा पोलीस ठाण्यात अफवा पसरवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.