महाराष्ट्र

maharashtra

नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे हित जपणारा नेता - शिवराजसिंह

By

Published : Jan 2, 2021, 4:10 PM IST

देशात आतापर्यंत नरेंद्र मोदींसारखा शेतकऱ्यांचे हित जपणारा एकही नेता झाला नाही, नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. असा दावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. त्यांनी नवीन वर्षानिमित्त शनिवारी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेतले, त्यावेळी ते बोलत होते.

Shivraj Singh Chouhan Latest News
शिवराजसिंह चौहानांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

नाशिक - देशात आतापर्यंत नरेंद्र मोदींसारखा शेतकऱ्यांचे हित जपणारा एकही नेता झाला नाही, नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. असा दावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. त्यांनी नवीन वर्षानिमित्त शनिवारी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेतले, त्यावेळी ते बोलत होते. तसेच लव्ह जिहादच्या कायद्याचे मध्य प्रदेशात कठोर पालन केले जाणार असून, दोषींवर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली.

नवीन वर्षानिमित्त शिवराजसिंह चौहान यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. गेले वर्ष भयावह होते. जगात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. कोरोनामुळे आपला देश देखील प्रभावित झाला, अर्थव्यवस्था कोलमडली, अनेकांचे रोजगार गेले, अनेकांचा मृत्यू झाला मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. देशाची परिस्थिती पूर्वपदावर यावी, आजपासून सुरू झालेले कोरोनाचे ड्राय रन यशस्वी होऊन, कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी प्रार्थना केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच लव्ह जिहादवर बोलताना ते म्हणाले की, राज्यात लव्ह जिहाद कायद्याचे कठोर पालन करण्यात येणार असून, आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल.

शिवराजसिंह चौहानांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

दरम्यान शिवराजसिंह चौहान यांनी आज त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते सपत्नीक त्र्यंबकेश्वर मंदिरात लघुरुद्र अभिषेक पूजा पार पडली. शिवराजसिंह चौहान हे दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डी तर दुसऱ्या दिवशी त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येत असता. यंदाच्या वर्षी देखील त्यांनी सहपरिवार दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली होती. दरम्यान दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या आंदोलनावर चर्चा करूनच तोडगा निघेल. हे तीनही नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे.

देशात जीएसटी चांगला वसूल होत असून, यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील बळकटी मिळणार आहे. त्यातून देशात चांगली रोजगार निर्मिती होईल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिवराजसिंह यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात पत्नी आणि आपल्या दोन मुलांसह दर्शन घेतल्यानंतर मंदिर विश्वस्तांनी त्यांचं स्वागत केले. आपला दौरा आटपून आज शिवराजसिंह चौहान हे मध्य प्रदेशकडे रवाना होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details