नाशिक - जगभरात उद्या (5 जून) पर्यावरण दिन साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपा प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या नद्यांना प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नाशिकमधील एक प्रमुख नदी म्हणून ओळख असलेल्या नंदिनी नदीची स्वच्छता मोहीम मनपा प्रशासन हाती घेणार आहे.
नंदिनी नदीची होणार स्वच्छता
'गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रयत्न करूनही नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे यासंदर्भात पुन्हा एकदा काम करण्यासाठी पर्यावरण दिनानिमित्त नाशिक मनपाने काम हाती घेतले आहे. नाशिक मधील एक प्रमुख नदी म्हणून नंदिनी नदीची ओळख आहे. या नदीच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. याची सुरवात उद्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केली जाणार आहे', अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे.