महाराष्ट्र

maharashtra

नांदेड शहरात 22 कंटेन्मेंट झोन; बहुतांश ठिकाणी अजूनही निर्बंध कायम

By

Published : Jun 9, 2020, 1:21 PM IST

नांदेडात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शहरात एकूण 22 कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे. यापैकी कोणत्याच कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या शिथिलता दिली जाणार नाही.

nanded containment zone
नांदेड जिल्ह्यात 22 कंटेनमेंट झोन

नांदेड- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात गेल्या सव्वा महिन्यात शहरात २२ कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील सर्व नागरिकांचे विलगीकरण करण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार हे परिसर शेवटचा रुग्ण निगेटीव्ह झाल्यानंतर २८ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येतात. केवळ पिरबुन्हाणनगरचा अपवाद वगळता इतर कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध अजूनही उठलेले नाहीत.

पिरबुन्हाणनगर भागात २२ एप्रिलला पहिला रुग्ण सापडला. सहा दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्ती निगेटीव्ह आल्याने त्याच्या मृत्यूनंतर तिसाव्या दिवशी, २८ मे रोजी येथील निर्बंध हटविण्यात आले. एकदा कंटेन्मेंट झोन घोषित केल्यानंतर त्या झोनमधील नागरिकांना बाहेर जाता येत नाही, तसेच बाहेरच्या नागरिकांना झोनमध्ये प्रवेश करता येत नाही. त्यांना केवळ वैद्यकीय उपचारासाठी आणि अत्यावश्यक कारणांसाठीच बाहेर जाता येते. जीवनावश्यक वस्तूदेखील घरपोच घ्याव्या लागतात. अबचलनगर, गुरुद्वारा, रहेमतनगर, कुंभार टेकडी या भागांतून कंटेन्मेंट झोनचे निबंध हटविण्याची मागणी केली जात आहे. विद्यमान परिस्थिती पाहून सकारात्मक निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले.

घोषित केलेले प्रतिबंधित क्षेत्र

अबचलनगर (२७ एप्रिल)
अंबानगर सांगवी (१ मे)
लंगरसाहिब गुरुद्वारा ( २ मे )
रहेमतनगर ( ३ मे )
करबला ( १० मे )
कुंभार टेकडी (१६ मे )
स्नेहनगर व लोहार गल्ली (२२ मे)
विवेकनगर, इतवारा, मिलत्तनगर, जिजामाता कॉलनी व जोशी गल्ली (२६ मे )
शिवाजीनगर ( २७ मे )
नई आबादी व रहेमान हॉस्पिटल देगलूर नाका (१ जून)
खय्युम प्लॉट (३ जून )
लेबर कॉलनी (५ जून)
उमर कॉलनी, गुलजारबाग व हनुमान मंदिर इतवारा (८ जून)

ABOUT THE AUTHOR

...view details