महाराष्ट्र

maharashtra

नाशिक- विहीर दिली खुली करून...

पाणी प्रश्न बिकट बनला असताना श्रावण भगत यांनी स्वत:ची खासगी विहीर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे.

By

Published : May 14, 2019, 4:48 PM IST

Published : May 14, 2019, 4:48 PM IST

श्रावण भगत यांनी सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी विहीर केली खुली

नाशिक- इगतपुरी तालुक्यात वैतरणा परिसरातील वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भावलवडी आदिवासी वाडा धरण परिसरात असूनही नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. वाड्यावर पाणी प्रश्न बिकट बनला असताना श्रावण भगत यांनी स्वत:ची खासगी विहीर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे.

श्रावण भगत यांनी सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी विहीर खुली केली

भावलवडी गावात एकच बोअरवेल आहे. पण, त्यालाही ठराविक अंतराने पाणी येते. परिणामी महिलांना पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते. श्रावण भगत यांनी सामाजिक बांधिलकीतून नागरिकांसाठी खाजगी असलेली विहीर खुली करून दिल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details