महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिककरांनो पाणी जपून वापरा..! जलवाहिनी दुरुस्तीसाठी या शनिवार-रविवारी पाणी पुरवठा नाही - महापालिका

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवारी ८ जूनला संपूर्ण दिवस आणि रविवारी ९ जूनला सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

नाशिक महापालिका

By

Published : Jun 7, 2019, 3:57 PM IST

नाशिक- महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवारी ८ जूनला संपूर्ण दिवस आणि रविवारी ९ जूनला सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

पंचवटी प्रभागातील कोणार्कनगर जवळ जलकुंभाच्या इनलेटचे क्रॉस कनेक्शनचे काम करणे, सातपूर विभाग नाशिक महापालिकेचे बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र आणि नाशिक रोड गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची १२०० मी मी व्यासाची पी.एस.सी मुख्य गुरुत्व वाहिनीचे दुरुस्तीचे काम करणे, नाशिक पश्चिम विभागात बुधवार पेठ येथील आठ इंच वॉल बदलणे आणि क्रॉस कनेक्शन करणे आणि त्यासंबंधी इतर कामे करण्यात येणार आहेत.

नाशिक महापालिका

नाशिक पूर्व विभागातही कालिका पंपिंग येथे ५०० बाय ५०० क्रॉस कनेक्शन करणे, मुकणे प्रकल्पाचे पाणी कथडा कालिका आणि भाभानगर जलकुंभात देण्यासाठी पाईपलाईन जोडणी करणे, कथडा जलकुंभ येथे ५०० मी मी वॉल बदलणे, चढा पार्क ते वडाळागाव जळगाव ४०० मी मी आणि उपवितरण वाहिनीवरील २५० मी मी व्यासाचे व्हॉल बदलणे, तसेच इतर आवश्यक काम करण्यात येणार आहेत.

तर आयटी पार्क जवळ जलकुंभ जवळ १२०० मी मी व्यासाची पी.एस.सी पाईपलाईन लिकेज काढणे आणि इतर आवश्यक काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजेपासून पूर्ण दिवस तर रविवारी सकाळी संपूर्ण नाशिक पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा होणार नाही. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details