नाशिक - भविष्यातील भारताकडून होणाऱ्या गगनयान मोहिमेसाठी चांद्रयान -२ कडून मिळणारी माहिती महत्वाची ठरणार असल्याचे स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी सांगितले. चांद्रायान-२ च्या मिशन बाबत त्या ई टीव्ही भारतशी बोलत होत्या...
भविष्यातील गगनयान मोहिमेसाठीसाठी चांद्रयान-2 कडून मिळणारी माहिती महत्वाची ठरणार - अपूर्वा जाखडी स्पेस एज्युकेटर (नासा) - chandrayan 2
ह्या चांद्रयान-२ माध्यमातून चंद्राच्या निर्मिती बाबतचा अभ्यास केला जाणार आहे. सोबतच पृथ्वीवरील धातू चंद्रावर मिळतील अशी शक्यता आहे त्यामुळे ह्या मोहिमेकडे भारतासह इतर देशाचे लक्ष असणार असल्याचे अपूर्वा जाखडी यांनी सांगितले.
२००८ मधील चांद्रायान-१ च्या यशानंतर अवघ्या १० वर्षानी भारताच्या इस्रोकडून जवळपास १ हजार कोटी रुपये खर्च केले असून चांद्रयान- 2 हे दुसऱ्यांदा चंद्रावर स्वारी करणार आहे. चांद्रयान- २ माध्यमातून चंद्राच्या निर्मिती बाबतचा अभ्यास केला जाणार असून यासोबतच पृथ्वीवरील धातू चंद्रावर मिळतील अशीही शक्यता आहे.
चांद्रयान-२ हे यान संपूर्ण स्वदेशी बनावटीचे असून यात असणारे ऑरबिटर, लँडर आणि रोवर हे भारतात तयार करण्यात आले आहेत. चांद्रायान-२ मध्ये १४ इंस्ट्रुमेंट्स असून यात १३ पेलोर्स भारताचे असून 1 इंस्ट्रुमेंट नासाचा आहे. यातील रोवर हा चंद्रावर जाऊन स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन माहिती गोळा करणार आहे. ही माहिती भविष्यात इस्रोसाठी महत्वाची ठरणार असून पुढील नियोजित गगनयानसाठी तिचा उपयोग होईल. तसेच ह्या चांद्रयान-2 मोहिमेकडे भारतासह इतर देशाचे लक्ष असणार असल्याचे अपूर्वा जाखडी यांनी सांगितले.