महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mutual tree felling : महावितरण कडून परस्पर वृक्षतोड,मनपा कडून कारवाईच्या हालचाली.. - Nashik News

वीज वितरण कंपनीने अडचणीचे ठरणारे झाडे व फांद्यांची तोडणी केली. (Mutual tree felling from MSEDCL) यावेळी त्यांनी वृक्ष प्राधिकरण समितीची पूर्वपरवानगी घेतली नाही. तसेच तोडलेल्या फांद्या रस्त्यावर टाकल्याने महावितरण विरोधात कारवाईच्या (may action from Municipal Corporation ) हालचाली सुरू झाल्या आहेत. समितीची परवानगी न घेतल्यामुळे संबंधित वृक्ष छाटणी बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत वृक्षसंवर्धन कायद्यांतर्गत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई बरोबरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

tree felling
वृक्षतोड

By

Published : Jun 25, 2022, 6:17 PM IST

नाशिक:नाशिक शहरात कॉलनी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आहेत, या ठिकाणावरून महावितरणाच्या ओवरहेड तारा गेल्या आहेत. पावसाळ्यात या ताऱ्यांमध्ये झाडांच्या फांद्या घासून शॉर्टसर्किट होते, त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो, ही बाब लक्षात घेत दरवर्षी मे महिन्यामध्ये महावितरण कंपनी मार्फत ठेकेदार नियुक्त करून धोकादायक वृक्ष तसेच कांद्याची छाटणी केली जाते.(Mutual tree felling from MSEDCL) नियमानुसार महापालिका क्षेत्रात कोणतेही वृक्ष तोडण्यासाठी तसेच साधी फांदी छाटण्यासाठी वृक्ष संरक्षण व संवर्धन महाराष्ट्र झाडांचे जतन अधिनियम कायदा 1975 व सुधारणा अधिनियम 2021 नुसार वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घ्यावी लागते, त्याची परवानगी न घेता वृक्षतोड केल्यास संबंधित व्यक्तीवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे, तसेच या कायद्यात दंडात्मक कारवाई सह एक वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे..



दंडात्मक कारवाई करणार :महावितरण विनापरवानगी ठेकेदारामार्फत झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत, त्या रस्त्यावरच टाकल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे प्राप्त झाल्या आहेत, त्यावर आयुक्त रमेश पवार यांनी नाशिक शहरातील सहा विभाग अधिकाऱ्यांना नेमक्या किती झाडांच्या फांद्या तोडल्या याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, रस्त्यावर फेकलेल्या फांद्या 24 तासात न उचलल्यास त्या पालिकेमार्फत उचलल्या जाणार असून त्यापोटी महावितरणकडून दंडात्मक शुल्क आकारण्याचे आदेश (may action from Municipal Corporation ) मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.


गुलमोहराचे झाडे बनली धोकादायक :गुलमोराचे झाड उन्मळूण पडल्याच्या घटना शहरात सातत्याने घडत असून त्यामुळे वित्त व जीवितहानी देखील झालेली आहे, गेल्या महिन्यात त्र्यंबक रोडवर रिक्षावर गुलमोराचे झाड पडून यात रिक्षाचालका सह एका प्रवाशी महिलेचा मृत्यू झाला होता, या दुर्घटनेत रिक्षाचा चंदामेंदा झाला होता, तर दोन महिन्यापूर्वी लेखानगर येथे गुलमोराच्या झाडाखाली फांदी एका युवकाच्या डोक्यावर पडल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला होता, तर या घटनेत एक जण जखमी झाला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या वकीलवाडी भागात रस्त्यावर गुलमोराचे झाड पडले सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही, मात्र या ठिकाणी वाहनांचे मोठे नुकसान झाले, वारंवार होणाऱ्या या घटनेमुळे नाशिक महानगरपालिकेने धोकादायक झाडांचा सर्वेक्षण करून ही झाडे काढून घ्यावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा :Eknath Shinde : एकनाथ शिंदे समर्थकांनी लावलेला पोस्टरला शिवसैनिकांनी फासले काळे, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details