नाशिक- मोहसीन शेख, अखलाक, पैलूखान, रोहित वैमुल्ला, डॉ. पायल तडवी पासून ते झारखंडच्या तबरेज अन्सारी या व्यक्तींना गोरक्षा, लव जिहाद, धर्म व जातीमुळे आपला जीव गमवावा लागला. या घटनेचा निषेध म्हणून आज नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने चौक मंडई भागात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
मॉब लिंचिंग प्रकरणातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मुस्लिम ब्रिगेडचे बोंबाबोंब आंदोलन - लव जिहाद
गोरक्षा, लव्ह जिहाद तसेच जातीय व्यवस्थेतेच्या नावाखाली लोकांची हत्या करणाऱया आरोपींवर दहशतवादी म्हणून कारवाई झाली पाहिजे, संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
गोरक्षा, लव्ह जिहाद तसेच जातीय व्यवस्थेतेच्या नावाखाली लोकांची हत्या करणाऱया आरोपींवर दहशतवादी म्हणून कारवाई झाली पाहिजे, संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच अशा घटनांमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराला 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी, अल्पसंख्याक समाजासाठी सुद्धा अल्पसंख्यांक अट्रॉसिटी कायदा बनवण्यात यावा, असे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान तसेच भारत सरकारला पाठवण्यात आले.
यावेळी अजीज पठाण, इब्राहिम अकतार, मुक्तार शेख, रफिक साबिर, नजीर पठाण, तनवीर शेख, निसार खाटीक, संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील, प्रफुल्ल वाघ, माधुरी भदाणे, अखिल खान, कयुम शेख, फरीद शेख, नदीम शेख यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.