महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारू पिण्यासाठी बसायच्या जागेवरून वाद, एकाचा खून; आरोपीला अटक

दारू पिण्यासाठी बसण्याच्या जागेवरून वाद झाला. या वादात एकाचा तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुनील शंकर महाजन असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर जग्गी उर्फ जगदीश दुर्गादास असे आरोपीचे नाव आहे.

नाशिक
नाशिक

By

Published : Aug 21, 2021, 4:07 AM IST

मनमाड (नाशिक) - शहरातील नगर पालिकेच्या अर्धवट बांधकाम असलेल्या सावित्रीबाई फुले मार्केटमध्ये दारू पिण्यासाठी बसण्याच्या जागेवरून वाद झाला. या वादात एकाचा तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनील शंकर महाजन (वय 26 वर्षे, रा. गायकवाड चौक) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, अवघ्या 12 तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जग्गी उर्फ जगदीश असं आरोपीचं नाव

याबाबत सविस्तर माहिती अशी, की मनमाड शहरातील पालिकेच्या मालकीचे अनेक ठिकाणी बंद गाळे आहेत. ते गाळे सध्या गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. रोज येथे बसून गुन्हेगारी स्वरुपाचे लोक दारू गांजा पित असतात. शहरातील खंडेराव मंदिरासमोर पालिकेचे अर्धवट अवस्थेतील सावित्रीबाई फुले मार्केट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते अपुर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे येथे रोज भिकारी, चरशी, तसेच गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांचे वास्तव्य असते. यातच 19 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 ते 10:30 च्या दरम्यान सुनील महाजन व जगदीश उर्फ जग्गी दुर्गादास (रा. इटारसी) यांच्यात दारू पिण्यासाठी बसायचा जागेवरून वाद झाला. यात दोघात झटापटी झाली. जग्गीने तीक्ष्ण हत्याराने सुनीलच्या पोटात वार केले. यामुळे तो जागीच मृत्युमुखी पडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. उपविभागीय पोलीस अधीक्षक समिरसिंग साळवे, पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला.

12 तासाच्या आत आरोपीला अटक

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 12 तासाच्या आत आरोपी जगदीश उर्फ जग्गी दुर्गादास यास अटक केली. या कामात राजेंद्र खैरनार, सुनील पवार, मुद्दसर शेख संदीप वणवे,संजय पैठणकर, रणजित चव्हाण, गौरव गांगुर्डे आदींनी सहभाग नोंदवला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -ठाण्यातील कार चालकाच्या हत्येचा 9 वर्षांनी निकाल, 4 आरोपींना जन्मठेप

ABOUT THE AUTHOR

...view details