महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक : येवल्यामध्ये दुकाने व भाजी विक्रेत्यांवर नगरपालिकेची धडक कारवाई - सायंकाळच्या वेळी कारवाई

येवला शहराच्या बाहेरील भागात सायंकाळी उघडी दुकाने व भाजी विक्रेत्यांवर नगरपालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. शहराच्या येवला-कोटमगाव रोडवर उड्डाण पुलाजवळ भाजी विक्रेते बसलेले होते व ग्राहकांनी देखील गर्दी केल्याने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्यासह नगरपालिकेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

येवला कारवाई
येवला कारवाई

By

Published : May 19, 2021, 1:12 AM IST

येवला (नाशिक)- शहरात सायंकाळच्या सुमारास उघडी असलेली दुकाने व भाजी विक्रेत्यांवर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी कारवाई केली आहे. परवानगी नसतांना दुकाने उघडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

सायंकाळच्या वेळी कारवाई

येवला शहराच्या बाहेरील भागात सायंकाळी उघडी दुकाने व भाजी विक्रेत्यांवर नगरपालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. शहराच्या येवला-कोटमगाव रोडवर उड्डाण पुलाजवळ भाजी विक्रेते बसलेले होते व ग्राहकांनी देखील गर्दी केल्याने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्यासह नगरपालिकेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तसेच नागड दरवाजा भागात नांदगाव रोडवरील उघड्यावर असलेल्या दुकाने व ज्याठिकाणी गर्दी असते त्याठिकाणी देखील नगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details