नाशिक- शहरातील इंदिरानगर येथील उड्डाणपुलावर मुंबई नाका पोलिसांनी सापळा रचून सहा लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी जीपचालक जैद सलाउद्दीन शेख (व.३३ रा. पाथर्डीफाटा) यास ताब्यात घेतले आहे. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांनी सदरील कारवाई केली आहे.
मुंबईनाका पोलिसांकडून ६ लाखांचा गुटखा जप्त
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईनाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी सचिन करंजे यांना अवैधरित्या गुटख्याचा मोठा साठा वाहून आणला जाणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना सांगितले. त्यानंतर अन्नसुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे, उपनिरीक्षक रेश्मा अवतारे यांच्यासह पथकाने द्वारका ते इंदिरानगर दरम्यान उड्डाणपूलावर सापळा रचला व गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहणाला पकडले.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईनाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी सचिन करंजे यांना अवैधरित्या गुटख्याचा मोठा साठा वाहून आणला जाणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना सांगितले. त्यानंतर अन्नसुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे, उपनिरीक्षक रेश्मा अवतारे यांच्यासह पथकाने द्वारका ते इंदिरानगर दरम्यान उड्डाणपूलावर सापळा रचला. दरम्यान त्यांना एक पांढऱ्या रंगाची पीक-अप जीप क्र. (एम.एच. १५ डी.के ४३५२) जी मुंबईकडून येत होती तिच्यावर संशय आला. पोलिसानी ती गाडी रोखून झडती घेतली असता जीपमध्ये पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये रंगबाज पान मसाला गुटख्याचा मोठा साठा मिळून आला. सुमारे ६ रुपये किंमतीचा साठा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.