नाशिक - मुंबई नाका पोलिसांनी शहरात घरफोडी करणाऱ्या हुक्का टोळीच्या मूसक्या आवळल्या आहेत. यावेळी पोलिसांनी मोठ्या कसोशीने बाबू अन्सारी, दीपक गायकवाड, वसील अब्दुल रेहमान शेख या तीन आरोपींना जेरबंद करत त्यांच्याकडून जवळपास 4 लाख 55 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीकडून अजूनही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
घरफोडी करणारी तडीपार गुन्हेगारांची टोळी जेरबंद
मुंबई नाका पोलिसांनी शहरात घरफोडी करणाऱ्या हुक्का टोळीच्या मूसक्या आवळल्या आहेत. यावेळी पोलिसांनी मोठ्या कसोशीने बाबू अन्सारी, दीपक गायकवाड, वसील अब्दुल रेहमान शेख या तीन आरोपींना जेरबंद करत त्यांच्याकडून जवळपास 4 लाख 55 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घरफोडी करणारी तडीपार गुन्हेगारांची टोळी
शहरात मध्यरात्री घरफोडी करणाऱ्या तडीपार गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यात मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाला यश आले आहे. बाबू पप्पू अन्सारी ऊर्फ सोहेल, दीपक पितांबर गायकवाड, वसीम अब्दुल रेहमान शेख अशी या संशयित गुन्हेगारांची नावे आहेत. या टोळीने शहरातील विविध आठ ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली असल्याचे उपआयुक्त अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
4 लाख 55 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त
दिवाळीच्या काळात शहर व परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. या गुन्ह्यांत भारतनगर परिसरातील हुक्का गांजा पिणाऱ्या टोळीतील संशयित सहभागी असल्याचीमाहिती मिळताच तडीपार कारवाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बाबूला अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याने व त्यांच्या साथीदारांनी मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा आणि भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अशा आठ घरफोड्या केल्याची कबुली दिली. या टोळीकडून सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाइल आणि रक्कम असा 4 लाख55 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीकडून अजूनही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, के. टी. रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असल्याचे पोलीस उपआयुक्त अमोल तांबे यांनी सांगितले आहे.