महाराष्ट्र

maharashtra

...म्हणून राज्य सरकारने सुमोटो कारवाई करावी - संजय राऊत

By

Published : Oct 24, 2021, 7:59 PM IST

Updated : Oct 24, 2021, 8:15 PM IST

महाराष्ट्रात असणारी चित्रपट उद्योग क्षेत्र हे बदनाम करण्याचा कट कारस्थान यानिमित्ताने होत असल्याचे देखिल समोर आले आहे, असे राऊत म्हणाले. या सुनियोजित प्रकरणाचा आता राज्य सरकारने स्वतंत्र चौकशी करत सुमोटो कारवाई केली पाहिजे, म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान हे कसं होतं हे देखील समोर येईल, असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत
संजय राऊत

नाशिक -एनसीबी हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची आता सुमोटो कारवाई करायलाचं हवी, अशी मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नांदगाव येथे केली आहे. राऊत हे तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर ती आहेत. रविवारी नांदगाव येथे वेगवेगळ्या विकास कामांचा भुमिपुजन तसेच उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी नांदगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'...म्हणून राज्य सरकारने सुमोटो कारवाई करावी'

'अतिशय सुनियोजित पद्धतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान'

या व्हिडिओच्या माध्यमातून नार्कोटिक कंट्रोल विभाग हा अतिशय सुनियोजित पद्धतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान करत होते, हे देखील आता या निमित्ताने समोर आले आहे. घरातल्या लोकांना ईडीकडे अपमानास्पद जावं लागतंय. महाराष्ट्रात असणारी चित्रपट उद्योग क्षेत्र हे बदनाम करण्याचा कट कारस्थान यानिमित्ताने होत असल्याचे देखिल समोर आले आहे, असे राऊत म्हणाले. या सुनियोजित प्रकरणाचा आता राज्य सरकारने स्वतंत्र चौकशी करत सुमोटो कारवाई केली पाहिजे, म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान हे कसं होतं हे देखील समोर येईल, असेही संजय राऊत म्हणाले. चित्रपट नगरी ही काहीच काम करत नाही. उगाच विनाकारण गांजा, अफू अशा पदार्थांमध्ये अडकून टाकले जाते. काही प्रकरणांवर संशय व्यक्त केला तर त्यांना राजद्रोही आणि देशद्रोही संबोधलं जातं हे योग्य नाही आहे. असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा-आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : पैशांची मागणी झाल्याचा संजय राऊतांचा ट्विटरवरून आरोप

Last Updated : Oct 24, 2021, 8:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details