नाशिक - शेतकर्यांना कर्जमाफी देत असताना मुख्यमंत्र्यांनी तत्वतः निकष लावलेत. यामुळे मतदारांनी आता मते देत असताना तत्वतः निकष लावणे गरजेचे आहे, असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. बागलाण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारार्थ नामपूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
मतदारांनी मत देताना मुख्यमंत्र्यांप्रमाणे तत्वतः निकष लावावा - खासदार डॉ.अमोल कोल्हे - MP dr amol kolhe election campaign rally nashik
शेतकर्यांना कर्जमाफी देत असताना मुख्यमंत्र्यांनी तत्वतः निकष लावलेत. यामुळे मतदारांनी आता मते देत असताना तत्वतः निकष लावणे गरजेचे आहे, असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.
हेही वाचा -सरकारची मस्ती मतदानातून उतरवा - खासदार डॉ. अमोल कोल्हे
कोल्हे म्हणाले, "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी पाच वर्षात एखादा उद्योग उभा करून पाच हजार युवकांनाही नोकरी मिळवून दिली नाही. उद्योजकांना कर्जमाफी दिली, मात्र शेतकर्यांना कर्जमाफी देत असताना तत्वतः निकष लावले. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी जनतेच्या भावना दुखवल्या आहेत. मतदारांनी आता मत देतानाही तत्वतः निकष लावणे गरजेचे आहे" कुस्ती करायला पहिलवान राहिले नाहीत, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना 'जर पहिलवान राहिले नाहीत तर पंतप्रधान, गृहमंत्री, भाजप अध्यक्ष हे महाराष्ट्रात आखाडा लढवायला येत आहेत की, कांदे खायला', अशी खिल्ली देखील डॉ. कोल्हे यांनी आपल्या भाषणादरम्यान उडवली.