नाशिक -मराठा समाजाचा नेता म्हणून नाही तर छत्रपतींचा मावळा म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कुठल्याही मोहिमेवर मी समाजासोबत आहे. कुठलाही पहिला वार माझ्या छातीवर होऊ द्या. मी कुणालाही भीक घालणार नाही, अशा शब्दात खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत समाजाला आश्वासीत केले. मराठा आंदोलनाला निर्णायक दिशा देण्यासाठी नाशिकमध्ये शनिवारी राज्यस्तरीय समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे भोसले बोलत होते.
मराठा समाजासाठी पहिला वार छातीवर घेण्यास तयार - छत्रपती संभाजीराजे - छत्रपती संभाजी राजे न्यूज
मराठा क्रांती मोर्चाच्या कुठल्याही मोहिमेवर मी समाजासोबत असून कुठलाही पहिला वार माझ्या छातीवर होऊ द्या, मी कुणालाही भीक घालणार नाही, असे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

विद्यमान परिस्थितीत आरक्षणाबाबत मराठा समाजात निर्माण झालेले समज गैरसमज, भरकटत जाणारे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन यावर मार्ग काढून मराठा आंदोलनाला निर्णायक दिशा देण्यासाठी नाशिकमध्ये राज्यस्तरीय समन्वयकांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत राज्यभरातून आलेल्या समन्वयकांनी भूमिका मांडली. या बैठकीत एकूण २३ ठराव संमत करण्यात आले.
अॅड. तांबे यांनी सामाजिक आरक्षणाविषयी आजपर्यंत घडलेल्या घडामोडींचा उहापोह करताना मंडल आयोगाने केलेली मराठा समाज पुढारलेला आहे ही शिफारस धादांत खोटी आणि वस्तुस्थिती नाकारणारी असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. तर सर्वोच्च न्यायालयात काम करणारे अॅड. श्रीराम पिंगळे यांनी मराठा आरक्षणाची मुद्देसुद व्यथा मांडली. एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण सुरक्षीत करायचे असेल तर राज्यपालांमार्फत हा प्रवर्ग राष्ट्रपतींना नोटीफाय करण्याची विनंती, घटना दुरूस्ती करून आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा रद्द करण्यासाठी केंद्र सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून अथवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दबाव आणणे यांसारखे काही पर्याय सुचवले.