महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 27, 2023, 7:39 PM IST

Updated : Feb 2, 2023, 6:00 PM IST

ETV Bharat / state

Vulture Conservation : नाशकात होणार गिधाडांचा कृत्रिम जन्म, राज्यातील अंजनेरीत एकमेव संवर्धन, प्रजनन केंद्र

केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या धोरणात्मक कृती आराखड्यानुसार महाराष्ट्रात गिधाड कृत्रिम प्रजनन केंद्र विकसित करण्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे. नाशिकमधील अंजनेरी शिवारातील वनजमिनीवर गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे गिधाडांच्या कृत्रिम जन्माचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Vulture Conservation
Vulture Conservation

नाशकात होणार गिधाडांचा कृत्रिम जन्म

नाशिक :हरियाणाच्या पिंजोर मधील गिधाड संगोपन, संवर्धन, प्रजनन केंद्राच्या धर्तीवर देशातील अन्य पाच राज्यात नव्याने कृत्रिम प्रजनन केंद्र स्थापन करण्याची घोषणा 2020 केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडून करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रात केवळ नाशिकला पसंती देण्यात आली आहे. केंद्राच्या कृत्रिम आराखड्यात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे शास्त्रज्ञांचाही सहभाग असणार आहे. अप्पर वनअधीक्षक दर्जाच्या अधिकारी यांच्याकडे राष्ट्रीय समन्वयकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे..

आठ कोटींचा निधी : भारतात नव्याने साकारल्या जाणाऱ्या पाच गिधाड संवर्धन, प्रजनन केंद्राच्या विकासासाठी सुमारे 40 कोटीचा निधी प्रास्तावित करण्यात आला आहे. नाशिक येथील संवर्धन, प्रजनन केंद्राच्या उभारणीसाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे वर्तवली जात आहे.

कुत्रीमरित्या अंडी उबवणार :गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रात पिंजोरच्या धर्तीवर गिधडांची अंडी कृत्रिमरीत्या उबवण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी हा महत्त्वकांक्षी प्रकल्प राबवण्याचा मानस वन विभागाने व्यक्त केला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम प्रकल्पाचा आराखडा तसेच खर्चाचे अंदाजपत्रकही मागवण्यात आले आहे.

सर्व सुविधा उपलब्ध : अंजनेरी शिवारातील वन जमिनीचा विचार गिधाडांच्या कृत्रिम प्रजनन केंद्र उभारणीसाठी केला जात आहे. वन विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्गे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे आदींनी या जागेला भेट देत जागेची पाहणी केली आहे. चांगले दळणवळण मार्ग, उत्तम इंटरनेट नेटवर्क, आठवड्यांचे सात दिवस 24 तास वीज पुरवठ्याची व्यवस्था अशा विविध अटी शर्ती यासाठी घालून देण्यात आल्या आहेत. हे वनक्षेत्र मुख्य रस्त्यापासून केवळ दोन किलोमीटर अंतर असल्यामुळे या जागेला पसंती देण्यात आली आहे.

'या' भागात गिधाडांचे वास्तव्य : नाशिकमध्ये पांढऱ्या पाठीचे तसेच लांब चोचीच्या गिधाडांचे वास्तव्य आढळून येते. यात खोरीपाडा, हरसुल, वाघोरा घाट आदी प्रजाती आढळुन येतात. तसेच या भागात हिमालयीन ग्रे फ्रॉन प्रजातीचेही दर्शन पक्षी निरीक्षकांना घडले आहे. हिमालयीन ग्रे फ्रॉनची संख्या कमी असून पांढऱ्या पाठीचे तसेच लांबचोचीच्या गिधाड्यांची संख्या या भागात त्या तुलनेत जास्त आहे.

गिधाडांचे होमटाऊन : संवर्धनासाठी वन विभागाने पुन्हा एक पाऊल पुढे टाकल्याने वनजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अंजनेरी हे गिधाडांचे नैसर्गिक होमटाऊन आहे. येथील अंजनेरी गडाच्या डोंगरांमधील कपारीमध्ये पेगलवाडी शिवारातील डोंगरांमध्ये गिधाडांची घरटी आढळून येतात. गिधाडांच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय स्तरावरून उचलले पाऊल ही आनंदाची बाब आहे. हा प्रकल्प म्हणजे अभ्यासंकासाठी अभिमानाची बाब असल्याचे वन्य अभ्यासक डॉ. अनिल माळी यांनी सांगितले.

हेही वाचा -New Governor Of Maharashtra : अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

Last Updated : Feb 2, 2023, 6:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details