नाशिक- दिंडोरी येथील ओझे कालवा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा तिच्या मुलांसह पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना घडली सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दिंडोरीच्या ओझे कालवा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकरांचा बुडून मृत्यू - omkar waghmare
अनिता यादव वाघमारे (वय ३०) तसेच त्यांचा मुलगा ओमकार यादव वाघमारे (वय १४) आणि प्राजक्ता बाळू गांगोडो (वय १५), असे बुडून मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.
अनिता यादव वाघमारे (वय ३०) तसेच त्यांचा मुलगा ओमकार यादव वाघमारे (वय १४) आणि प्राजक्ता बाळू गांगोडो (वय १५), असे बुडून मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. ओझे कालवा नदीवर अनिता वाघमारे या सकाळी कपडे धुण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यांच्यासोबत मुलगा ओमकार आणि प्राजक्ता हे दोघेही गेले होते. त्यावेळी हे तिघेही नदीत बुडाले. या तिघांचेही मृतदेह ओझे येथील ग्रामस्थांनी पाण्यातून संध्याकाळी बाहेर काढले.
अनिता यादव वाघमारे, ह्या उमराळे येथील रहिवासी असुन त्या अंगणवाडीच्या मदतनीस सेविका आहेत. घटनास्थळी प्रांतधिकारी सदिप आहेर, तहसीलदार बाबासाहेब गाढवे आणि वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी नदीवर थांबून शोध मोहिमेस मार्गदर्शन केले. ४ तासांच्या प्रयत्नानंतर तळाशी असलेल्या गाळात संध्याकाळी उशिराने यांचे मृतदेह हाती लागले.