नाशिक - मायलेकींनी रेल्वेपुढे उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही घटना रविवारी सकाळी देवळाली कॅम्प परिसरात घडली. अनिता बाळासाहेब शिरोळे (४२) राखी बाळासाहेब शिरोळे (२२ ) अशी त्या आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. मात्र या मायलेकींनी आत्महत्या का केली. याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
Mother And Daughter Suicide : हृदयद्रावक: गितांजली एक्सप्रेसपुढे उडी घेऊन मायलेकीची आत्महत्या, परिसरात हळहळ - देवळाली कॅम्प नाशिक
रविवारी सकाळी साडे नऊ वाजता कँम्प येथील एअर फोर्स स्टेशनच्या गेट जवळील पाळदे मळा परिसरात दोघी मायलेकींनी गितांजली एक्सप्रेससमोर उडी घेतली. या घटनेत दोघींचेही मृतदेह छिन्नविछिन्न झाले.
![Mother And Daughter Suicide : हृदयद्रावक: गितांजली एक्सप्रेसपुढे उडी घेऊन मायलेकीची आत्महत्या, परिसरात हळहळ Mother And Daughter Commits Suicide](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15423070-294-15423070-1653891180779.jpg)
गितांजली एक्सप्रेससमोर घेतली उडी -भगूर येथील बाळासाहेब शिरोळे हे सोलापूर येथे नोकरीनिमित्त राहतात. तर त्यांची पत्नी अनिता या मुलगी राखी, तिचा भाऊ हे चुलत्यासह भगूर येथे राहतात. रविवारी सकाळी साडे नऊ वाजता कँम्प येथील एअर फोर्स स्टेशनच्या गेट जवळील पाळदे मळा परिसरात या दोघी मायलेकींनी गितांजली एक्सप्रेससमोर उडी घेतली. या घटनेत दोघींचेही मृतदेह छिन्नविछिन्न झाले. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाने देवळाली पोलीस ठाण्याला दिली. रेल्वे विभागाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. दोघी मायलेकींनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आर टी मोरे यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.