नाशिक - राज्यातील राजकिय परिस्थितीने नाट्यमय वळण घेतले आहे. सत्ता स्थापनेच्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना नाशिकचे तीन आमदार शनिवारी सकाळपासूनच राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीसाठी उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. निफाडचे आमदार दिलीप बनकर हे मुलाची शस्त्रक्रिया असल्याने परत आले.
शुक्रवारपासून मुंबईत असल्याचा खुलासा दिलीप बनकर यांनी केला. बनकर शुक्रवारी सायंकाळी आठ वाजेपर्यंत पक्षाच्या नेत्यांसमवेत होते. त्यांना शनिवारी पहाटे फोन आला आणि ते राजभवन येथून धनंजय मुंडे यांच्या घरी गेले.