मालेगाव (नाशिक)- लॉकडाऊनच्या उपचार मिळाले नाही म्हणून इतर आजारांमूळे 600 हुन अधfक रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप माजी आमदार असिफ शेख यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात कोरोनाचे थैमान सुरू असून आतापर्यंत एकट्या मालेगावात 331 जणांना कोरोनाची लागण झाली असून 13 जणांचा यात मृत्यू झाला आहे. मात्र, दुसरीकडे लॉकडाऊन काळात विविध आजारांमुळे वेळेवर उपचार मिळाले नाही म्हणून 600 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप माजी आमदार असिफ शेख यांनी म्हटलं आहे.
या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून माहिती कळवली आहे. माजी आमदार शेख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, आमच्या माहिती प्रमाणे लॉकडाऊन काळात मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांव्यतिरिक्त 600 जणांचा मृत्यू हा हृदय विकार, मधुमेह, उच्च रक्तदाबमुळे झाले आहेत. या रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. मालेगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषीमंत्री दादा भुसे हे विविध उपाययोजना राबवत आहेत. मात्र, कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांबाबत प्रशासनाने कोणतेही नियोजन नसल्याने मालेगावात परिस्थिती गंभीर झाली आहे. यामुळे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी आमदार असिफ शेख यांनी केली आहे.