महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडणाऱ्यांवर नाशिक पोलिसांचा कारवाईचा बडगा - nashik traffic police news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शहर वाहतूक विभागाने जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जी वाहन शहरात अवैधरित्या फिरतायत अशा चालकांवर कारवाई करून वाहतूक पोलिसांनी तब्बल २२ लाख ७५ हजार १०० रुपयांचा दंड आकारला आहे.

नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडणाऱ्यांवर नाशिक पोलिसांचा कारवाईचा बडगा
नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडणाऱ्यांवर नाशिक पोलिसांचा कारवाईचा बडगा

By

Published : May 11, 2020, 4:52 PM IST

नाशिक - लॉकडाऊन काळात प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करून सर्रासपणे बाहेर फिरणाऱ्यांवर नाशिक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. आत्तापर्यंत शहरात तब्बल ५ हजार ४३७ जणांवर १८८ कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न करता काही नागरिक सर्रासपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. तर, सुरक्षेच्या दृष्टीने मास्क घालणे बंधनकारक असताना मास्क न वापरता बाहेर पडणाऱ्यांचेही प्रमाण अधिक आहे. मात्र, अशाप्रकारे बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कंबर कसली असून १ हजार २२६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडणाऱ्यांवर नाशिक पोलिसांचा कारवाईचा बडगा

पोलिसांनी वारंवार सांगूनही काही नागरिक हे बाहेर फिरत असल्यामुळे पोलिसांना आता ही कारवाई करण्याची वेळ आली आहे. सद्या जिह्यात कोरोनाचे थैमान अधिक वाढत चालले असून कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ६७२ वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचीही चांगलीच चिंता वाढली आहे. मात्र, नागरिक हे अद्यापही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. तर, घराबाहेर विनाकारण फिरताना दिसत आहेत. त्यामुळे आता शहर वाहतूक विभागाने जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जी वाहन शहरात अवैधरित्या फिरतायत अशा चालकांवर कारवाई करुन वाहतूक पोलिसांनी तब्बल २२ लाख ७५ हजार १०० रुपयांचा दंड आकारला आहे. तर सोबतच, नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडता, घरातच सुरक्षित राहावे असे आवाहनही पोलिसांमार्फत केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details