नाशिक - येथील एका सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे ही घटना घडली.
रविवारी मोहाडी येथे आई-वडील घरी नसताना सहा वर्षीय मुलगी घरात खेळत होती. त्या मुलीच्या घरासमोर असणारा एका १३ वर्षाय अल्पवयीन मुळाने खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलवून तिच्यावर बलात्कार केला. सायकांळी बालिकेचे आई-वडील घरी आल्यानंतर जेव्हा त्या मुलीला त्रास होऊ लागला. यानंतर पालकांनी चौकशी केल्यानंतर पीडितेने घडलेला प्रसंग सांगितला.