नाशिक - मालेगावात जमावाने पोलीस चौकीवर हल्ला केल्याचा व्हिडियो व्हायरल झाला होता. यानंतर सर्वत्र हल्लेखोर नागरिकांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या. मात्र, हा पोलिसांवरील हल्ला नसून अत्यावश्यक सेवा मिळत नसल्याने काही लोकांचा जमाव एकत्र आल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. याप्रकरणी संचारबंदीचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
'मालेगावात पोलीस चौकीवर हल्ला नाही; अत्यावश्यक सेवा मिळत नसल्याने जमाव एकत्र' - malegaon police
मालेगावात जमावाने पोलीस चौकीवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर सर्वत्र हल्लेखोर नागरिकांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या. मात्र, हा पोलिसांवरील हल्ला नसून अत्यावश्यक सेवा मिळत नसल्याने काही लोकांचा जमाव एकत्र आल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.
'मालेगावात पोलीस चौकीवर हल्ला नाही ; अत्यावश्यक सेवा मिळत नसल्याने जमाव एकत्र'
या घटनेचा व्हिडिओ सर्व माध्यमांवर फिरत होता. मात्र संबंधित जमावाला अत्यावश्यक सेवा मिळत नसल्याने ते एकत्र आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. त्यांनी पोलिसांवर हल्ला केला नाही. दगडफेक केली नाही, असा खुलासा मालेगावचे पोलीस उपअधीक्षक संदीप घुगे यांनी केला आहे. मात्र संचारबंदीचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.