नाशिक- येथील पूर्व मतदार संघात मनसेच्या अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली. राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी बंद दाराआड राष्ट्रवादी आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामुळे मुर्तडक राष्ट्रवादीला साथ देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मनसे अन् राष्ट्रवादीचं ठरलं? नाशिकमध्ये चर्चेला उधाण - nashik assembly contituency
राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी बंद दाराआड राष्ट्रवादी आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली.
मनसे आणि राष्ट्रवादीचं ठरल?
हेही वाचा-शिरुर शहरातून भाजप अध्यक्ष अमित शाहंची रॅली
दरम्यान, राज ठाकरेंची नाशिकच्या डोंगरे वस्ती मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यासभेनंतर खरे काय ते समोर येईल. मात्र, या बैठकीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.