महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hanuman Chalisa Row : नाशिकच्या मालेगाव मनमाडमध्ये मनसे शहारध्यक्षासह 6 कार्यकर्त्यांना अटक - MNS Six Activists Arrested In Nashik

राज ठाकरे ( Raj Thackeray Appeal For Hanuman Chalisa ) यांनी हनुमान चालीस पठणाचे ( Hanuman Chalisa Row ) आवाहन केल्यानंतर मनमाडमध्ये मनसे कार्यकर्त्यांवर 149 अंतर्गत कारवाई करण्यात आहे. तसेच मनसे शहराध्यक्ष सचिन शिरूड ( Sachin Shirud Arrest In Manmad ) यांच्याह 6 कार्यकर्त्यांसहनी पोलिसांनी अटक केली आहे.

Loudspeaker Row LIVE Updates
Loudspeaker Row LIVE Updates

By

Published : May 4, 2022, 3:47 PM IST

मनमाड - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Hanuman Chalisa Row ) यांनी हनुमान चालीस पठणाचे ( Hanuman Chalisa Row ) आवाहन केल्यानंतर मनमाडमध्ये मनसे कार्यकर्त्यांवर 149 अंतर्गत कारवाई करण्यात आहे. तसेच मनसे शहराध्यक्ष सचिन शिरूड ( Sachin Shirud Arrest In Manmad ) यांच्याह 6 कार्यकर्त्यांसहनी पोलिसांनी अटक केली आहे. सद्यस्थितीत मालेगाव मनमाड नांदगांवला शांतता कायम आहे.

रात्री 10 ते 6 भोंगे बंद -3 तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवा, अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. त्यानुसार मनमाड, मालेगाव, नांदगांवसह नाशिकच्या ग्रामीण भागात सर्व मशिदी व मंदिरवरील भोंगे शांत होते. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करत रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत एकही भोंगा मनमाड शहरात वाजवला गेला नाही. तर कोणत्याही धर्मात दुसऱ्या धर्माच्या विरोधात द्वेष करा असे शिकवले जात नसल्याचे येथील मौलानानी सांगितले. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून 4 अधिकारी 70 कर्मचारी व 35 होमगार्ड यांचा बंदोबस्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी दिली.

हेही वाचा -Local Body Elections : जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक दोन आठवड्यात जाहीर करा.. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details