नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये पाकीट माराने पाकीट मारत हात साफ केला. मात्र, ही बाब कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र, यावेळी चोरट्यांचा सुळसुळाट बघायला मिळाला. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यासाठी ठाकरे नाशिकमध्ये आले आहेत. राज यांना भेटण्यासाठी हॉटेल एक्स्प्रेस इनच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. तब्बल दीड वर्षानंतर राज ठाकरे नाशिकमध्ये आल्यावर त्यांना बघण्यासाठी झालेली गर्दी आणि भेटण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह लक्षात घेऊन काही चोरांनीदेखील या गर्दीत दाखल होत पाकिट मारण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या समोरच या चोरट्याने मनसे सरचिटणीस आणि इतर पदाधिकाऱ्यांचे पाकीट चोरले. मात्र, काही कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी या चोरट्याचा पाठलाग केला.