महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईडी'च्या नोटीसनंतर नाशकात मनसेचा बॅनरबाजीतून निषेध - raj thakre

चौकशी कोहिनूर मिलची नाही, तर मराठी माणसाच्या हृदयातील कोहिनूर हिऱ्याची करतायेत, अशा आशयाचे फलक येथील मनसैनिकांनी ठिकठीकाणी लावले आहेत. यातून राज ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे.

'ईडी'च्या नोटीसनंतर नाशकात मनसेचा बॅनरबाजीतून निषेध

By

Published : Aug 19, 2019, 7:41 PM IST

नाशिक- चौकशी कोहिनूर मिलची नाही, तर मराठी माणसाच्या हृदयातील कोहिनूर हिऱ्याची करतायेत, अशा आशयाचे फलक आज सोमवारी येथील मनसैनिकांनी ठिकठिकाणी लावले आहेत. यातून राज ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, यामुळे ही पोस्टरबाजी चांगलीच चर्चेत आली आहे.

कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी उमेश जोशी यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आली. तर राज ठाकरे यांनाही नोटीस बजावल्याने त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याच्या शक्यतेमुळे नाशिक शहरात मनसे कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली. यात नोटीस विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मनसे शहराध्यक्ष श्याम गोहाड यांच्या नावाने लावण्यात आलेल्या होर्डिंगवर, चौकशी कोहिनूर मिलची नाही, तर मराठी माणसाच्या हृदयातील कोहिनूर हिऱ्याची करतात. इतक्या मोठ्या संपत्तीचे ते एकमेव वारसदार आहेत, म्हणून अशा नोटिसा येऊ लागल्या आहेत. राज साहेब तुम्ही एकटे नाही, तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा मजकूरही या बॅनरमध्ये झळकवण्यात आला आहे. सोशल मीडियावर तुम्ही ईडी तर आम्ही रेडी, अशा खळखट्याक मजकुराचे पोस्टर व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details