नाशिक -जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी वणी येथील उपसरपंच विलास कडे यांच्या मळ्यात कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी उपसरपंच कडे यांनी दिंडोरी तालुक्यातील शेतीसंबंधी दळण वळण विषयक समस्यांची माहिती सादर करत रोहित पवार यांना दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बागाईतदार शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र द्राक्ष परिक्षण प्रयोगशाळेची मागणी केली.
हेही वाचा -ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास २५ ते ५० लाखांचा निधी; नरहरी झिरवाळ यांची घोषणा
रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर चर्चा केली व त्यांचे मार्गदर्शन केले. नैसर्गिक आपत्तींमुळे द्राक्ष शेती करणे पहिल्यासारखे सोपे राहिले नाही. त्यातच कोरोनामुळे विदेशात होणारी निर्यात थांबली असल्याने शेतकरी अजून संकटात सापडला जाण्याची शक्यता आहे. परंतु, राज्य सरकारतर्फे निर्याती संदर्भात लवकरच ठोस पाऊले उचलली जातील, असे रोहित पवार यांनी सांगितले.