नाशिक - जिल्ह्यातील चांदवडेच आमदार डॉ. राहुल आहेर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
थोडी शंका आली होती म्हणून काल कोरोना तपासणी केली. दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होईल आणि आपल्या सेवेत तत्पर होईल. तरी गेल्या 7-8 दिवसांत माझ्यावर प्रेम करणारी जी लोक माझ्या संपर्कात आली त्यानां माझी विनंती आहे की, आपण सर्वानी काळजी घ्यावी, अशी पोस्ट केली आहे. संपर्कात आलेल्या पैकी कुणाला त्रास होत असेल तर त्यांनी डॉक्टरांना भेटून तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती देखील आमदार डॉ. राहुल आहेर यानी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केली आहे.
दरम्यान, यापूर्वी राज्यातील मंत्री, आमदार व खासदारांनी कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी काही जण कोरोनामुक्त झाले तर काहींवर अजूनही उपचार सुरू आहेत. आता नाशिक जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातही कोरोनाने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे.