आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद नाशिक :उरूस निघाल्यावर त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्याची परंपरा नाही. ज्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला ते जिहादी विचारांचे आहेत. गावचे लोक आमच्यासोबत आहे, अशी परंपरा नाही. मंदिर बंद असताना आतमध्ये शिरन्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात हिरवे झेंडे होते. आतमध्ये जाऊन चादर चढवायची होती का? असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते आतमध्ये आले होते. कर्नाटक निकालामुळे अजून हवा भरली आहे.
आमचे काही नालायक लोक आहेत त्यांना हवा देत आहे. मात्र, मंदिर प्रशासनाने हा प्रयत्न हाणून पाडला. आम्हाला दंगल भडकविण्याची गरज नाही, हिंदू कधीच पहिले पाऊल टाकत नाही,असा प्रकार अजमेर शरीफला केला असता तर चालले असते का? हाजी अली दर्ग्यात असा हट्ट दाखविला जातो. याच उत्तर आम्हाला हिंदू म्हणून मिळाले पाहिजे - नितेश राणे, भाजप आमदार
हिंदू धर्मात यायचे असेल तर या :इथले मुस्लिम हिंदू आहेत, हिंदू धर्म फार विशाल आहे. तुम्हाला हिंदू धर्मात यायचे असेल तर या, पण असले गैरप्रकार करू नका. आमची आमदारकी गेली डब्यात. याला लॅन्ड जिहाद म्हणतात,जो या ठिकाणी आला त्यावर पोकसो गुन्हा दाखल आहे. अशी मूल आले तर त्यांना डोक्यावर घ्यायचे का? अशी प्रश्नाची सरबत्ती नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. लॅन्ड जिहादचे प्रकार तुम्ही सुरू केले आहे. आता किती हिंदू राहिले आहे याचा रिपोर्ट बघा. आमचे धार्मिक स्थळ आहे. इथे मटण चिकनचे दुकान हवे आहे का? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला..
एसआयटीमध्ये सत्य बाहेर येईल :ही भाजपची बैठक नाही. मी हिंदु म्हणून याठिकाणी आलो आहे. पक्षाचे बैठक असेल त्यावेळेस तुम्हाला बोलवेल. संभाजी नगरला दंगल झाली, त्यातले नावे तपास दंगल भडकविणारे आमचे नाही. इथे कुठलीही दंगल घडणार नाही. हिंदूची संख्या कमी होत चालली आहे, म्हणून हे सगळं सुरू आहे. आज हिंदू म्हणून आवाज उठविला नाही तर तुमचे व्यवसाय राहणार आहेत का? एसआयटी चौकशी नेमलेली आहे त्यात सत्य बाहेर येईल. आतापर्यंतची सर्व चौकशी झाली पाहिजे. जे अतिक्रमण झाले आहे त्यावर जिल्हाधिकारी यांनी लक्ष घातले पाहिजे. जे आमचे आहे ते आमचे झाले आहे. भाविक भक्त येतात त्यांनी घाबरू नये. शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यवी असे नितेश राणे म्हणाले आहेत. 24 तासात एसआयटी दाखल झालेली आहे. पोलीसांनी मंदीरात प्रवेश करणाऱ्यांना ताब्यात घेतल आहे. समाज कंटकांकडून बहुतेक किल्ल्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. संजय राजाराम राऊत हिंदू राहिलेला नाही. त्यानी त्याविषयी बोलू नये अशी टीका नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे.
आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद
काय आहे प्रकरण : 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर हे हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र स्थानांपैकी एक आहे. मंदिर ट्रस्ट व्यवस्थापनानुसार, गैर - हिंदूंना मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नाही. शहरातील दर्ग्यात दरवर्षी संदल मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक जेव्हा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ येते तेव्हा सेवेकरी दरवाजाच्या पायरीजवळ येऊन त्र्यंबकेश्वराला धूप दाखवतात आणि पुढे मार्गस्थ होतात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यादिवशी सुद्धा आम्ही देवाला धूप दाखवण्यासाठीच आलो होते, आमचा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न नव्हता, असे दुसऱ्या गटाने आपल्या बचावात सांगितले आहे.
हेही वाचा -
- Ajit Pawar On MahaVikas Aghadi : महाविकास आघाडी कायम एकत्र असणार - अजित पवार
- Sanjay Raut : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून खासदार संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
- UPSC Result 2022 : विडी कामगाराच्या पोराने करुन दाखवलं; युपीएससी केली क्रॅक