महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत समुद्र,उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आला का ? नितेश राणे गरजले.. - सांगली भाजप बातमी

हे फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर भेटतात का ? आमचे घर 12 वर्षांपासून तिथेच आहे.आताच मुंबई महापालिकेला जाग आली का ? सीआरझेड विभागाला पण आताच जाग आली का ? जे उत्तर द्याचे आहे, ते आम्ही 10 जुन'ला देऊ, आणि कायदेशीर उत्तर देऊ पण या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावरचं कशा येतात ? अगोदर महापालिका नव्हती,अगोदर समुद्र नव्हता का ? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर समुद्र मुंबईत आला आहे,का ? असा संतप्त सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

mla nitesh rane on cm uddhav thackerays current politics in sangli
मुंबईत समुद्र,उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आला का

By

Published : May 31, 2022, 9:19 PM IST

Updated : May 31, 2022, 9:55 PM IST

सांगली -मुंबईमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर समुद्रा आला आहे का ? आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावरच कश्या नोटीस येत आहेत. इतके वर्षे मुंबई पालिकेला जाग कशी आली नाही,अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई महापालिकेवर,त्यांच्या बंगल्याला दिलेल्या नोटीस वरून संताप व्यक्त केला आहे. ते मिरज येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

मुंबईत समुद्र,उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आला का ?
घराला दिलेल्या नोटीसीवरुन राणेंचा संताप -भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईच्या जुहू या समुद्र किनारी असलेल्या 'अधिश'बंगल्याला सीआरझेडच्या अटींचे भंग केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती आणि आता त्यापाठोपाठ मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला आहे. यावरून आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेवर हल्लाबोल केला आहे. आमदार नितेश राणे म्हणाले,या सगळ्या नोटीस आहेत,सगळया अनियमित आहे.

आताच मुंबई महापालिकेला जाग आली का -हे फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर भेटतात का ? आमचे घर 12 वर्षांपासून तिथेच आहे.आताच मुंबई महापालिकेला जाग आली का ? सीआरझेड विभागाला पण आताच जाग आली का ? जे उत्तर द्याचे आहे, ते आम्ही 10 जुन'ला देऊ, आणि कायदेशीर उत्तर देऊ पण या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावरचं कशा येतात ? अगोदर महापालिका नव्हती,अगोदर समुद्र नव्हता का ? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर समुद्र मुंबईत आला आहे,का ? असा संतप्त सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

Last Updated : May 31, 2022, 9:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details