महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार नरहरी झिरवळ 'नॉट रिचेबल', आंदोलनाचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा इशारा

आमदार झिरवळ यांचा फोन गेल्या ३ दिवसांपासून लागत नसल्यामुळे ते उद्यापर्यंत सापडले नाहीत, तर रास्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला.

आमदार नरहरी झिरवळ 'नॉट रिचेबल'

By

Published : Nov 24, 2019, 3:42 PM IST

नाशिक- दिंडोरी पेठ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी सिताराम झिरवळ गेल्या ३ दिवसांपासून घरच्यांच्या संपर्कात नाहीत. यामुळे झिरवळ यांचा मुलगा गोकूळ यांनी वणी पोलीसांत तक्रार दाखल केली. मात्र, त्यांच्या फोनचे लोकेशन राजभवनात दिसत असल्याने मुंबईला तक्रार करण्याचा सल्ला वणी पोलिसांनी दिला आहे.

आमदार नरहरी झिरवळ 'नॉट रिचेबल'

याच कारणामुळे गोकूळ झिरवळ आणि दिपक झिरवळ हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. लवकरच शरद पवार यांची भेट घेऊन आम्ही तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार झिरवळ यांचा फोन गेल्या ३ दिवसांपासून लागत नसल्यामुळे ते उद्यापर्यंत सापडले नाहीत, तर रास्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी दिंडोरी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, मधुकर भरसट , विलास कड, दतु बाबा कावळे, रवी सोनवणे ,संतोष रेहेरे, धोंडीराम थैल, इंद्रा गांगुर्डे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते

ABOUT THE AUTHOR

...view details