नाशिक -निफाड तालुक्यातील नैताळ्यांच्या यात्रेत चार वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घडली आहे. संशयित नराधमाला यात्रेतील नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सुदाम भिकाजी सोनवणे (रा. कोळवाडी, ता. निफाड) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या विरुध्द निफाड पोलिसांत पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -साताऱ्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण, पोलिसांच्या दक्षतेने तीन आरोपी गजाआड
पीडित चिमुकलीच्या कुटुंबांनी दिलेल्या माहिती नुसार निफाड तालुक्यातील नैताळे येथे यात्रा सुरु आहे. पीडित मुलीचे कुटुंब यात्रेत रोजगारासाठी आले होते. 14 जानेवारीच्या रात्री 8 वाजता मुलगी अचानक कामाच्या ठिकाणाहुन बेपत्ता झाल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेतला असता यात्रेबाहेर एक जण मुलीला हाताला धरून विंचूरच्या दिशेने घेऊन जाताना आढळून आला.