नाशिक - कोरोना संदर्भात अद्याप कुठलेही औषध तयार करण्यात आलेले नाही. भारतात त्याची निर्मिती देखील झालेली नाही आहे. मात्र, जर कोणी कोरोनासाठी हे औषध आहे किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे औषध आहे, असे म्हणून कोणी विक्री करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अशी माहिती अन्न औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी नाशिकमध्ये दिली.
कोरोना संदर्भात अद्याप कुठलंही औषध तयार करण्यात आलेला नाही - राजेंद्र शिंगणे - मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याबद्दल बातमी
कोरना संदर्भात अद्याप कुठेलेही औषध तयार करण्यात आलेले नसून भारतात त्याची निर्मिती झालेली नाही. मात्र, जर कोरोनासाठी हे औषध आहे. किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध आहे, असे म्हणून विक्री करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
यासोबतच मास्कला प्राईज लावणे यासाठी देखील मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अशा बाबत अफवा देखील पसरवल्या जात आहे. त्यादृष्टीने देखील त्यांच्यावर सायबर पोलिसांच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. असे कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई देखील करत आहोत. राज्यात कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर बनावट असल्याचे अनेक ठिकाणी कारवाई मध्ये समोर आले आहे. त्यातून जवळपास एक ते दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. कोरोनाच्या संदर्भात सर्वांनी काळजी घेन्याचे आवाहन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केले आहे.
दोन दिवसांमध्ये नाशिकमध्ये बनावट पद्धतीचे सॅनिटायझर आढळून आले होते. त्याच पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे नाशिक दौऱ्यावर आले होते. सॅनिटायझर उत्पादकांशी त्यांनी या वेळी चर्चा केली. त्या दरम्यान अनेक उत्पादकांनी अल्कोहोल बेस् उपलब्ध आणि विदाउट अल्कोहोल बेस सॅनिटायझर उत्पादनाबाबत प्रस्ताव मांडला आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेऊ अशी भूमिका शिंगणे यांनी घेतली.