नाशिक- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महाराष्ट्र दिन: नाशकात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण - नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ
महाराष्ट्र दिनानिमित्त आज नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी सामाजिक अंतर ठेवण्यात आले होते.
कोरोनाचे संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवत कमीत कमी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करून ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तसेच रांगोळीच्या माध्यमातून कोरोनाला हरवण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे, अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी अरविंद अतुरलीकर, तहसीलदार पंकज पवार, रचना पवार उपस्थित होत्या.
हेही वाचा -लॉकडाऊनच्या काळात येवला टपाल खात्याची सेवा, रुग्णाला घरपोच पोहचवले औषध