नाशिक- माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ऑनलाइन व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहरातही औरंगाबाद रस्त्यावरील जय शंकर लॉन्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितीत व्हर्च्युअल रॅलीला संबोधित केले.
गोरगरीब जनतेसाठी सतत लढणाऱ्या शरद पवारांना शुभेच्छा - छगन भुजबळ - नाशिक छगन भुजबळ व्हर्च्युअल रॅली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ऑनलाइन व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहरातही औरंगाबाद रस्त्यावरील जय शंकर लॉन्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितीत व्हर्च्युअल रॅलीला संबोधित केले.
![गोरगरीब जनतेसाठी सतत लढणाऱ्या शरद पवारांना शुभेच्छा - छगन भुजबळ नाशिक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9857081-979-9857081-1607781016947.jpg)
दरम्यान, ठाण्याच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी औक्षण केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन पवार यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वेबसाईटचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
नाशिकमध्येही या व्हर्च्युअल रॅलील चांगला प्रतिसाद लाभला. आमदार सरोज अहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, शेफाली भुजबळ, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, विष्णुपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाना महाले, गजानन शेलार, दिलीप खैरे, संजय खैरनार, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगले, युवक काँग्रेसचे अंबादास खैरे, रवींद्र पगार आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.