महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निकृष्ट तांदूळ प्रकरणी नागपूरसह गडचिरोलीच्या पुरवठा अधिकाऱ्यांचे निलंबन - छगन भुजबळ - नाशिक तांदूळ पुरवठा प्रकरण

अनेक जिल्ह्यांतून अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने राज्यस्तरीय उपनियंत्रण अंमलबजावणी आणि एफसीआर प्रतिनिधी यांचे संयुक्त पथक तयार करून ‘सीएमआर’ साठवलेल्या सर्व गोदामांची चौकशी करण्याचे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत.

मंत्री छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ

By

Published : May 29, 2020, 7:50 PM IST

नाशिक - कोरोना साथीच्या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभार्थ्यांना निकृष्ट प्रतीचा तांदूळ पुरवल्याने नागपूर व गडचिरोलीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे निलंबन करून खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. तसेच ज्या राईस मिलमधून निकृष्ट प्रतीचा तांदूळ प्राप्त झाला आहे, त्या राईस मिलवर जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा व त्यांची मिलिंग परवानगी रद्द करावी, असे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत.

तसेच अनेक जिल्ह्यांतून अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने राज्यस्तरीय उपनियंत्रण अंमलबजावणी आणि एफसीआर प्रतिनिधी यांचे संयुक्त पथक तयार करून ‘सीएमआर’ साठवलेल्या सर्व गोदामांची चौकशी करण्याचे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत.

भुजबळ यांनी सार्वजनिक वितरण विभागाची बैठक घेत धान्याची पाहणी केली. त्यावेळी प्राप्त झालेल्या तांदूळ आणि डाळीचे नमुने त्यांनी नाशिक जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांतून मागवले असता, त्यांना तांदळाचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे निदर्शनास आले. याबाबत भुजबळांनी माहिती घेतली असता हा तांदूळ नागपूर आणि गडचिरोली येथील राईस मिलमधून आल्याचे त्यांना सांगण्यात आले. भुजबळांनी तत्काळ याची गंभीर दखल घेत नागपूर व गडचिरोलीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे निलंबन करून खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले. ज्या राईस मिलमधून निकृष्ट प्रतीचा तांदूळ प्राप्त झाला आहे, त्या राईस मिलवर जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा व त्यांची मिलिंग परवानगी रद्द करावी, असे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details