महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील कोरोना स्थिती फारशी सुधारली नाही, लोकांनी सहकार्य करावे - मंत्री छगन भुजबळ - कोरोना स्थिती

ब्रिटनमध्ये 2 ते 3 वेळेस लॉकडाऊन केला आणि उघडला. रुग्णसंख्या पुन्हा वाढली तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

छगन भुजबळ
छगन भुजबळ

By

Published : Jul 30, 2021, 3:17 PM IST

Updated : Jul 30, 2021, 3:45 PM IST

नाशिक -शनिवार व रविवार पैकी एक दिवस दुकान सुरू ठेवण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. आमची चर्चा झाली याबाबत टास्क फोर्स निर्णय घेईल. केरळमध्ये रुग्ण संख्या वाढली. परिस्थिती फारशी सुधारली नाही. ब्रिटनमध्ये 2 ते 3 वेळेस लॉकडाऊन केला आणि उघडला. रुग्णसंख्या पुन्हा वाढली तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

मंत्री छगन भुजबळ

'दोन डोस घेतले की नाही हे कोण बघणार?'

मुंबईत लोकल सुरू करण्यामध्ये प्रॅक्टिकल अडचणी आहे. दोन डोस घेतले की नाही हे कोण बघणार? पुर परिस्थिती बाबत बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पूरग्रत भागाला मदत पोहोचवली जाते आहे. पूरग्रस्त भागात दहा किलो गहू, डाळ, केरोसीन वाटपाचे काम सुरू झाल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली आहे.

'रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार गडकरींकडे करणार'

केंद्रिय मंत्री गडकरी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांच्या भेटीवर बोलताना विकास कामांसाठी भेटी सुरू असतात. यात राजकीय काही असण्याची शक्यता नाही. खड्ड्याबद्दल बोलताना मला तर नेहमी या खड्ड्यांचा त्रास होतो. पूर्वी मुंबई जायला अडीच तास लागायचा. आता जास्त वेळ लागतो. मला नेहमी मुंबईहुन नाशिकला मीटिंगसाठी यावे लागते. त्यामुळे फार त्रास होतो. नितीन गडकरींना याबाबत भेटून सांगणार असल्याचे भुजबळ यानी सांगितले आहे.

Last Updated : Jul 30, 2021, 3:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details